Charholi : चऱ्होली खुर्दमध्ये कचऱ्याच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
एमपीसी न्यूज – च-होली खुर्दमधील आळंदी मरकळ (Charholi) रस्त्याच्या कडेने काही बेशिस्त नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तेथे कचरा फेकला जातो.त्या कचऱ्यास अज्ञात व्यक्तींकडून आग लावली जाते. तसेच त्या कचऱ्याच्या ठिकाणी विद्युत वाहिनीचे पोल सुद्धा आहे. वारंवार तेथील कचऱ्याला लागणाऱ्याक त्या आगीमुळे तिथे दुर्घटनेची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे.