Railway : कामशेत- तळेगाव दरम्यानचे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी दोन दिवस बंद

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावरील कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानकां दरम्यानचे रेल्वे फाटक (Railway) दुरुस्तीच्या कामासाठी बुधवार (दि. 17) आणि गुरुवारी (दि. 18) बंद राहणार आहे. याबाबत पुणे रेल्वे मंडळाचे जनसंपर्क अधिकारी रामपाल बडपग्गा यांनी दिली.

कामशेत-तळेगाव रेल्वे स्थानकां दरम्यान रेलवे किमी 148/5-6 वर असलेले रेल्वे फाटक संख्या 45, आवश्यक दुरुस्तीच्या कामानिमित्त बुधवारी आणि गुरुवारी सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहील.

Talegaon Dabhade : समाजात वावरताना दुराग्रहीपणा नसावा – गुलाबराव महाराज खालकर

हे रेल्वे फाटक बंद असताना जवळच असलेले जांभूळ गेट (रेल्वे किमी 151/4 -5 येथील फाटक संख्या 47)  वाहतुकीसाठी पर्याय (Railway) म्हणून उपलब्ध असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.