Pimpri : पूर्ववैमनस्यातून महिलेवर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज –  पूर्ववैमनस्यातून  एकाने महिलेवर कोयत्याने वार केले ( Pimpri) आहेत. ही घटना रविवारी (दि.5) पिंपरी मेन मार्केट येथे घडला आहे.
या प्रकरणी सोमवारी (दि.6)  महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून नारायण देवासी  (वय 28 रा.पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने फिर्यादी या पिंपरीतील झूलेलाल मंदिराजवळ असताना कोयत्याने हातावर डोक्यात वार केले. यावरून पिंपरी पोलिसांनी आरोपीवर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारहाण करणे असा गुन्हा दाखल ( Pimpri)  केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.