Pune : आयपीएचतर्फे मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी गुरुवारी ‘निरंतर’ अभ्यास गट

एमपीसी न्यूज- इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ (IPH) तर्फे मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिकांसाठी, एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ‘निरंतर’ अभ्यास गटात मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी, त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी तसेच त्यांची कौशल्ये वाढवण्यासाठी पूरक विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन व चर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असलेला हा अभ्यास गट विनामूल्य असून महिन्यातून एकदा पूर्वनियोजित तारखांना IPH कर्वेनगर येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या उपक्रमांतर्गत पहिला निरंतर गट 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजीकल हेल्थ, 4, यशश्री कॉलनी, वेदांत नगरी जवळ, कमिन्स कॉलेज रोड, कर्वे नगर, पुणे या ठिकाणी होणार असून ज्येष्ठ मनोविकार तज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. या निरंतर गटामध्ये नावनोंदणी करण्यासाठी 7588098060 या फोन क्रमांकावर व्हाट्सऍप द्वारे इमेल आयडी, फोन नंबर व गटाचे नाव, इ. माहिती देणारा मेसेज पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. या अभ्यासगटातील जागा मर्यादित आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.