Pimpri : विद्यापीठ अधिसभेवर भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांची वर्णी
एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला महासभेने आयत्यावेळी मान्यता दिली.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार कुलगुरुंनी विद्यापीठ क्षेत्रातील नगरपालिका किंवा महापालिका सदस्यांपैकी एका सदस्याचे विद्यापीठ अधिसभेवर एक वर्षासाठी नामनिर्देशन करण्याची तरतूद आहे. एक वर्षासाठी ही निवड केली जाते. यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पालिकेच्या एका नगरसेवकाची नियुक्ती केली जाणार आहे.
पालिकेच्या नगरसेवकांपैकी किमान पदवीधर असलेल्या एका नगरसेवकाचे नाव विद्यापीठाच्या निवडणूक विभागाकडे पाठवावे, असे पत्र विद्यापीठाच्या निवडणूक विभागाच्या उपकुलसचिवांनी पालिकेला पाठविले होते. त्यानुसार सत्ताधारी भाजपने शिक्षण मंडळाच्या उपसभापती शर्मिला बाबर यांचे नाव पाठविले आहे.