Pune News : कबुतर घरात आणल्याच्या वादानंतर सराईत गुन्हेगाराकडून 55 वर्षीय आईला मारहाण

एमपीसी न्यूज : पुण्यातील शनिवार पेठेतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात कबूतर घेऊन आल्याने वाद झाल्यानंतर एका सराईत गुन्हेगाराने आपल्या 55 वर्षीय आईला झाडूने आणि उलथन्याने बेदम मारहाण केली. जय राजेश भोसले असे या गुन्हेगाराचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वीच तो आपली तडीपारी संपवून परत आला होता. त्यानंतर परत पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या आईने विश्रामबाग पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दिली. 

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय भोसले हा सराईत गुन्हेगार आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला तडीपार केले होते. तडीपारी संपल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी तो शनिवार पेठेतील घरी आला होता. दरम्यान रविवारी त्याने काही कबूतर घेतली आणि घरी आला होता. त्यावेळी आईने कबुतर घरात घाण करत आहे घरात का आणले असे त्याला विचारले. यावरून दोघांत वाद झाला आणि त्याने आईला मारहाण करण्यास सुरुवात केली.

 

 

दरम्यान आईला मारहाण होत असल्याने जय पत्नी मध्यस्थी करत असताना त्याने पत्नीला देखील मारहाण केली. या सर्व प्रकारानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात आईने तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी जय भोसले याला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.