India Corona Update : चोवीस तासातील रुग्णवाढ दोन लाखांच्या खाली, 2.53 लाख कोरोनामुक्त 

एमपीसी न्यूज – देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली आली आहे. दिलासादायक बाब म्हणजे बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असून, चोवीस तासांत 2.53 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

1. गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 67 हजार 059 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

2. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट कमी झाली असून तो 11.69 टक्के एवढा झाला आहे.

3. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 17.43 लाख ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

4. गेल्या 24 तासांत 1 हजार 192 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

5. ICMR च्या आकडेवारीनुसार आजवर देशात 73.06 कोटी प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत 14.28 लाख चाचण्या पार पडल्या.

6. देशाचा रिकव्हरी रेट 94.60 टक्के एवढा झाला आहे.

7. कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम अंतर्गत 166.68 कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

8. दिल्लीत गेल्या 61.45 लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.

9. देशात आजवर 4 लाख 96 हजार 242 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशाचा मृत्यूदर 1.20 टक्के एवढा आहे.

10. देशातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्येची टक्केवारी 4.20 टक्के एवढी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.