Pune News : औरंगाबादच्या व्यावसायिकाला सव्वा चार कोटींचा गंडा

एमपीसी न्यूज : औरंगाबाद जिल्ह्यातील सराफ व्यवसायिकाला गौरव पवारने तबल सव्वा चार कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांना जमिनीचा मोबदला देण्याचा बहाणा करण्यात आला होता.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गौरव प्रल्हादराव पवार (वय 38) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 33 वर्षीय व्यवसायिकाने तक्रार दिली आहे. 2012 ते 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी हे औरंगाबाद येथील आहेत. ते सराफ व्यवसायिक आहेत. त्यांची मुळशी तालुक्यात वडिलोपार्जित जमीन होती. दरम्यान त्यांची ओळख झाल्यानंतर पवार याने त्यांना जमिनीचा चांगला मोबदला मिळवून देतो, असे सांगितले. तसेच पनवेल येथील प्रकल्पात 10 एकर क्षेत्रात शेअर मिळवून देतो असे सांगितले. त्यांच्याकडून व त्यांच्या भावाकडून तबल 4 कोटी 20 लाख रुपये उकळले. तर त्यांची मुळशी येथील जमीन घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. याबाबत तक्रारदार यांनी पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला होता. त्याची चौकशी करण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.