Theft News : कंपनीच्या स्टोअर रुममधून तीन लाख रुपयांचे केबल चोरीला

एमपीसी न्यूज – सोळू खिंड येथील एका कंपनीच्या स्टोअर रूममधून तब्बल 3 लाख रुपयांची केबल चोरीला गेली आहे. हा प्रकार 2 ऑक्टोबर ते सोमवारी 3 ऑक्टोबर या कालावधीत पी.आर.जी. अँटोमिशन येथे घडला आहे.

या प्रकरणी रियाज अमीन शेख (वय 30 रा. डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ST Buses : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामुळे एसटी बसेसचा तुटवडा, सर्व सामान्यांचे हाल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पी.आर.जी. अँटोमिशन या कंपनीच्या स्टोअर मधील 3 लाख रुपयांची तांब्याची वायर चोरट्यांनी चोरून नेली आहे.हा प्रकार सोमवारी उघडकीस आल्यानंतर आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.