Pune News : जिल्ह्यात बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेटप्रकरणी  संबंधितांवर गुन्हा दाखल; आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत 

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यात फिरत्या मोटारींतून बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राचे आंतरजिल्हा रॅकेट कार्यरत असून संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून न्यायालयात खटला सुरू असल्याची माहिती राज्याचे राज्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेत दिली. 

डॉ. सावंत म्हणाले, ‘‘इंदापूर तालुक्यातील मौजे सराटी या गावाच्या हद्दीत काही लोक बेकायदेशीरपणे गर्भलिंग परिक्षण करीत असल्याची माहिती 13 मे रोजी उपजिल्हा वैद्यकीय अधिक्षकांना मिळाली.त्यानुसार घटनास्थळी भेट दिली असता गर्भलिंग परिक्षण करीत असल्याचे निदर्शनास आले.या प्रकरणात लॅब टेक्निशियन, डॉक्टर आणि वाहन चालकावर गर्भधारणापूर्व व प्रसूतिपूर्व निदान तंत्रे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.