Crime News : लग्नाच्या अमिषाने महिलेशी शारीरिक संबंध ठेवून बदनामीच्या दिल्या धमक्या 

एमपीसी न्यूज – एका महिलेस लग्नाची अमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवून बदनामी करण्याच्या धमक्या दिल्या.याबाबत पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात  फिर्याद दिली आहे.

गणेश गोरे, (वय 24 रा. जिल्हा बीड) या आरोपी विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना  9 मे, 2021 पासून ते 23 ऑगस्ट 2022  ला रात्री 11.40 वा पर्यंत रुपीनगरमधील लॉजवर व वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर व फिर्यादी राहत असलेल्या  ठिकाणच्या रूमवर घडली आहे.

फिर्यादी व आरोपी यांची ओळख इंस्टाग्राम या ॲपवरून ओळख झाली होती.आरोपीने रुपीनगर येथील लॉजवर व वेगवेगळ्या ठिकाणच्या लॉजवर फिर्यादी रहात असलेल्या ठिकाणीच्या रूमवर त्यांना लग्नाच्या आमिष दाखवून त्यांच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले.फिर्यादीबरोबर मोबाईलवर व इंस्टाग्रामवर व व्हाट्सअपवर संभाषण करून बदनामी करण्याची धमकी दिली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.