Alandi : आळंदीत वारकऱ्यांवर सौम्य लाठी चार्ज

एमपीसी न्यूज – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवारी (दि. 11) आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. यादरम्यान आळंदी (Alandi) मध्ये वारकरी आणि पोलीस यांच्यामध्ये तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी वरकऱ्यांवर सौम्य लाठीचार्ज केला.

Photo Feature : अलंकापुरी आज भारवली ….माऊलींच्या पालखी सोहळ्याची क्षण चित्रे

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे वेळेत प्रस्थान करण्यासाठी तसेच खबरदारी म्हणून आळंदी (Alandi) देवस्थान समितीकडून दिंड्या मधील ठराविक वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. एकूण 47 दिंड्यांमध्ये प्रत्येकी 75 वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार होता. मात्र पालखी प्रस्थानाच्या वेळी अचानक वारकऱ्यांनी गर्दी केली. गर्दी केलेल्या वारकऱ्यांना मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी थांबवले. मात्र अचानक एकाने पोलिसांवर टाळ रोखला. त्यामुळे पोलीस आणि वारकरी यांच्यात तणाव निर्माण झाला. दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून वारकऱ्यांची गर्दी पांगवली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.