Sangvi : माहेरून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे तगादा लावला. यासाठी तिने नकार दिला असता तिला माहेरी निघून जाण्याची धमकी दिली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

पती राम मनोहर साळुंखे (रा. पिंपळे सौदागर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 26 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम याचे पहिले लग्न झाले होते. ही बाब न सांगता त्याने पीडित महिलेशी दुसरा विवाह केला. विवाहानंतर महिलेकडे माहेरहून हुंडा आणण्यासाठी वेळोवेळी तगादा लावला. यासाठी महिलेने नकार दिला असता तिला माहेरी निघून जाण्याची धमकी दिली. राम याने पीडित महिलेला वारंवार शिवीगाळ करत मारहाण केली. याबाबत महिलेने सांगवी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.