Pune: कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या ‘त्या’ खून प्रकरणात धक्कादायक खुलासा, जवळच्या मित्रानेच केला घात

A shocking revelation in the rickshaw driver murder case that took place in Koregaon Park, the attack was done by a close friend मृत रिक्षाचालक जगताप हा दारु पिऊन सतत मारहाण करायचा आणि शिवीगाळ करायचा या रागातून त्याने हे कृत्य केले.

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरात रिक्षाचालक राहुल जगताप (वय 47) याचा कोयत्याने वार करून निर्घुण खून करण्यात आला होता. या खुनाचा छडा लागला असून पोलिसांनी याप्रकरणी मृत जगतापच्या जवळच्या मित्राला अटक केली आहे.

प्रितम उर्फ बाळू उर्फ पांग्या रघुनाथ मोरे (वय 36) असे आरोपीचे नाव आहे. मृत रिक्षाचालक जगताप हा दारु पिऊन सतत मारहाण करायचा आणि शिवीगाळ करायचा या रागातून त्याने हे कृत्य केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत राहुल जगताप त्याला दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर तो समोरील व्यक्तींना शिव्या द्यायचा, मारहाण करायचा. दोन दिवसांपूर्वी राहुलने दारू पिल्यानंतर प्रितमला शिवीगाळ आणि मारहाण केली होती.

या आधीही अनेकदा राहुल जगतापने मारहाण केली होती. या रागातून त्याने दोन दिवसांपूर्वी राहुल जगताप हा रिक्षातून घरी परत जात असताना त्याच्यावर कोयत्याने हल्ला चढवला आणि त्याचा खून केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.