Kasarwadi News : भोसरी मेट्रो स्टेशनखाली क्रेनवर टॅंकर आदळून अपघात

एमपीसी न्यूज – भोसरी मेट्रो स्टेशनखाली क्रेनवर टॅंकर आदळून अपघात झाला आहे. मेट्रोच्या पिलरला रंग देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रेनवरती आदळून आज (मंगळवारी, दि.05) पहाटे ही घटना घडली. 

याबाबत अधिकची माहिती अशी की, भोसरी मेट्रो स्टेशनखाली मेट्रोच्या पिलरला रंग देण्यासाठी वापरली जाणारी क्रेन उभी आहे. या क्रेनला धडकून टॅंकरचा अपघात झाला आहे.

टॅंकर रस्ता सोडून दुभाजकात असलेल्या झाडाला धडकला आहे. टॅंकरची समोरची बाजू धडकल्याने टॅंकरचे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.