Wakad News : प्रेमसंबंधातून बेडशीटने गळफास घेऊन आत्महत्या 

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंधातून बेडशीटने गळफास घेऊन 35 वर्षीय इसमाने आत्महत्या केली आहे. रॉयल इंटरडा सोसायटी, भुमकर चौक, हिंजवडी येथे 13 डिसेंबर 2021 रोजी ही घटना घडली. 

सुहास लक्ष्मण ओल्लालवार (वय 35) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील लक्ष्मण सांबाजी ओल्लालवार (वय 35, रा. चंद्रपूर) यांनी सोमवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरून नैना शरद आरेवार / नैना अमित मुन्नीगेला (वय 32) या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुहास याने प्रेमसंबंधातून होणा-या त्रासाला कंटाळून राहत्या घरी बेडशीट फॅनला गुंडाळून आत्महत्या केली. त्याने आरोपी महिलेच्या नावाने सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.