Chinchwad : विनामास्क फिरणाऱ्या 252 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – करोना बाधितांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. पोलीस आणि महापालिका प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही अनेकजण विनामास्क शहरात फिरत आहेत.

अशा बेशिस्त नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) विनामास्क फिरणाऱ्या 252 जणांवर कारवाई केली. एमआयडीसी भोसरी (32), भोसरी (13), पिंपरी (08), चिंचवड (25), निगडी (11), आळंदी (17), चाकण (24), दिघी (12), सांगवी (08), वाकड (08), हिंजवडी (33), देहूरोड (13), तळेगाव दाभाडे (13), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (19), रावेत चौकी (05), शिरगाव चौकी (06), म्हाळुंगे चौकी (05) या पोलीस ठाण्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.