Chinchwad : संचारबंदीचे उल्लंघन करणा-या 89 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – सरकारी आदेशाचे उल्लंघन करून मनाई करण्यात आलेली दुकाने सुरु ठेवणा-या तसेच विनाकारण घराबाहेर घुटमळणा-या नागरिकांवर कारवाई करण्याची मोहीम सुरूच आहे. दररोज दुकानदार आणि नागरिकांवर कारवाई केली जात आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात असताना देखील नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत नाहीत. बुधवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 89 जणांवर भारतीय दंड विधान कलम 188 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

संपूर्ण भारत देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य, जिल्हा आणि शहरांच्या देखील सीमा सील करण्यात आल्या आहेत. केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणा-या यंत्रणा सुरु आहेत. त्यांना देखील प्रशासनाकडून विशेष परवानगी घेऊन प्रवास तसेच हालचाली कराव्या लागत आहेत. अनेक नागरिक शहरात जिथल्या तिथे अडकून पडले आहेत.

संचारबंदी लागू असताना असताना अत्यावश्यक वस्तू आणि सेवा घेण्याव्यतिरिक्त घराबाहेर पडणे, तसेच विनाकारण सार्वजनिक ठिकाणी घुटमळणे हा गुन्हा आहे. जिल्हाधिका-यांनी संपूर्ण जिल्ह्यातील जीवनावश्यक वस्तू आणि सेवा पुरविणा-या दुकानांच्या व्यतिरिक्त अन्य दुकाने, मॉल बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांना झुगारून अनेक दुकानदार मागल्या दाराने दुकाने सुरु ठेऊन दैनंदिन व्यवहार करीत आहेत. अशा दुकानदारांवर कारवाई केली जात आहे.

सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात येते. बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात 89 जणांवर कारवाई करण्यात आली.

बुधवारी करण्यात आलेली कारवाई –
आळंदी – 16
तळेगाव एमआयडीसी – 01
देहूरोड – 17
पिंपरी – 07
भोसरी – 17
चाकण – 03
दिघी – 19
तळेगाव दाभाडे – 09
एकूण – 89

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.