Chikhali News : संतपीठात प्रवेशप्रक्रिया सुरू; असे असेल शुल्क अन् विद्यार्थी प्रवेशक्षमता

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संचालित चिखलीतील ‘जगद््गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’त 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. यातील अभ्यासक्रम केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात ‘सीबीएसई’च्या नियमानुसार आहे, अशी माहिती संतपीठाचे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.

कंपनी कायदा 2013 च्या कलम 8 अंतर्गत महापालिकेने चिखलीत ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ’ स्थापन केले आहे. महाराष्ट्र स्वयंअर्थसाहाय्यित शाळा (स्थापना व विनिमय) नियम- 2012 अंतर्गत शाळेचे कामकाज सुरू आहे. संतपीठामध्ये नर्सरी ते पाचवीपर्यंतच्या वर्गांमध्ये प्रवेश दिला जात आहे.

येथील अभ्यासक्रम, व्यवस्थापन, कार्यपद्धती, अध्ययन आणि अध्यापन प्रणाली ‘सीबीएसई’ नुसार इंग्रजी माध्यमातून असेल. त्यामध्ये मराठी, हिंदी आणि संस्कृत भाषांचा समावेश असेल. प्रवेशप्रक्रियेसाठी प्रथम चौकशी अर्जांचे वाटप करण्यात येईल. अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख 20 मार्च आहे. पात्र अर्जामधून जागांच्या उपलब्धतेनुसार सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड केली जाईल.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

असे असेल शुल्क अन् विद्यार्थी प्रवेशक्षमता

पूर्वप्राथमिक अर्थात नर्सरी ते सीनियर केजीपर्यंत प्रतिविद्यार्थी 20 हजार रुपये, पहिली ते तिसरीपर्यंत प्रतिविद्यार्थी 27 हजार रुपये आणि चौथी ते पाचवी प्रतिविद्यार्थी 32 हजार रुपये शैक्षणिक शुल्क असेल. अन्य शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा आकारला जाणार असल्याचेही राजेश पाटील यांनी सांगितले. नर्सरीसाठी 70 विद्यार्थी संख्या, ज्युनिअर केजीसाठी 30, सीनियर केजीसाठी 27 आणि पहिली ते पाचवी (प्रती वर्गासाठी) 40 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता असणार आहे.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.