Pune News : पुण्यात आज राज्यभरातून मनसैनिक येणार ? राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 16 वा वर्धापन दिवस आज पुण्यात पार पडतोय. पहिल्यांदाच मुंबईबाहेर अशाप्रकारे मनसेचा वर्धापन दिवस पार पडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी पार पडणाऱ्या या सोहळ्याला राज्यभरातून मनसैनिक येणार असल्याची माहिती पुणे शहर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 9 मार्च या दिवशी करण्यात आली होती. मनसेचा वर्धापन दिवस म्हटले की मोठा सोहळाच असतो. राज्यभरातील माणसं येत असतात. वर्धापन दिनाला राज ठाकरे काय बोलणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असतं. यावर्षी प्रथमच पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच सभागृहात वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे.

त्यामुळे या परिसरात मोठमोठे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी देखील माहिती आहे. त्यामुळे अवघ्या राज्याचे लक्ष वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमाकडे लागलेले आहे. या वर्धापन दिनी राज ठाकरे काय बोलणार? महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर मनसेचा वर्धापन दिन पुण्यात नाही ना असे अनेक प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.

Watch on Youtube: ऐकाआजचे एमपीसी न्यूज पॉडकास्ट! ऐका पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ठळक बातम्या

राज्यातील महापालिका निवडणुकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी मनसेला नाशिक महापालिकेत सत्ता मिळाली होती. यावेळी राज ठाकरेंनी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे यंदा पुण्यात होणारा मनसेचा वर्धापन दिन किती लाभदायी ठरतो हे येणारा काळच ठरवेल.

Watch on Youtube: काऊंटडाऊन दहावी! भाग 8 : दहावीच्या भूगोलातही मिळवा भरभरून मार्क स्मिता करंदीकर

Watch on Youtube: प्रवासी एन्जॉय करतायत मेट्रोचं स्वर्ग सुख | पाहा फुगेवाडी ते पिंपरी मेट्रो प्रवासाचा ग्राऊंड रिपोर्ट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.