Akurdi : अवैधपणे वृक्षतोड करणा-या कंपनीकडून 45 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – वेगवेगळ्या प्रजातीच्या 90 वृक्षांची (Akurdi) अवैधपणे तोड करणा-या आकुर्डी येथील मे. फॉरमायका कंपनीकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेने तब्बल 45 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच दोन झाडे विनापरवाना काढणा-या प्रभाकर न्यालकंठी यांच्याकडून 1 लाख रुपये दंड वसूल केला आहे. महापालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे अवैधपणे वृक्षतोड करणा-यांचे धाबे दणाणले आहेत.

पिंपरी महापालिका कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 अमलात आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील कोणत्याही वृक्षांचा विस्तार कमी करणे, वृक्षतोड करणे, वृक्ष पुनर्रोपन करणे पालिकेच्या उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, आकुर्डीतील मे फॉरमायका कंपनीने अनधिकृतपणे वृक्ष काढलेली आहेत. या जागेवर वृक्ष गणनेच्या माहितीच्या आधारे असलेले वेगवेगळया प्रजातीचे एकूण 90 वृक्ष जे. सी. बी च्या सहाय्याने वृक्ष काढल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते.

PCMC News : महापालिकेचा सर्वेअर एसीबीच्या जाळ्यात

विनापरवाना वृक्ष काढल्यामुळे (Akurdi) प्रत्येकी एका वृक्षाकरीता 50 हजार रूपये प्रमाणे एकूण 90 वृक्षासाठी 45 लाख रूपयांचा दंडाची नोटीस महापालिकेने फॉरमायका कंपनीला पाठविली होती. त्यानुसार कंपनीकडून 90 झाडे विनापरावाना काढल्याप्रकरणी 45 लाख रुपयांचा दंड 28 जुलै 2022 रोजी वसूल करण्यात आला आहे. तसेच दोन झाडे विनापरवाना काढणा-या प्रभाकर न्यालकंठी यांच्याकडून 1 लाख रुपये दंड वसूल केला आहे. ही कारवाई 27 जुलै रोजी करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.