Akurdi : समाज सेवा केंद्रातील शिबिरात 50 रक्तदात्यांनी केले रक्तदान

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील समाज सेवा केंद्रात रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला. सृष्टीमार्ग संस्था आणि समाजसेवा केंद्र आकुर्डी यांच्या यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उदघाटन जानकीदेवी बजाज ग्राम विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अरुण जोशी, महेश सहकारी बॅकेचे संचालक अजय लढढा, सृष्टीमार्ग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण पुराणिक, स्वाती देशपांडे यांच्या हस्ते झाले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागाने या रक्त संकलनात महत्वपूर्ण भूमिका बजावली.

  • या शिबिरास 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले, परंतु याचा लाभ 80 रुग्णांना होऊ शकतो, असे डॉ. स्वाती यांनी सांगितले. एकूण 115 लोकांनी शिबिरास भेट दिली, परंतु वैद्यकीय दृष्ट्या परिपूर्ण नसल्यामुळे रक्तदात्यांना परत पाठवावे लागले.

सृष्टीमार्ग संस्था हि पर्यावरण आणि सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था असून गेली चार वर्ष रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहे.

  • या रक्तदान शिबिरास सृष्टीमार्ग संस्थेचे पदाधिकारी योगेश महाशब्दे, दत्तात्रय जोशी, पियुष कुलकर्णी, कल्याणी कुलकर्णी, तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक अनंत (नाना) दामले,केशव महाशब्दे, वसंत देशपांडे व निलेश चव्हाण आणि समाजसेवा केंद्र च्या सर्व सहकाऱ्यांनी संयोजन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.