Akurdi News: दुचाकीस्वारांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एकास लुटले

एमपीसी न्यूज – दोन दुचाकीवर आलेल्या सहा आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका इसमाला कोयत्याचा धाक दाखवून लूटले. हि घटना संजय काळे ब्रिजजवळ आकुर्डी येथे बुधवार (दि. 13) रोजी रा. 2 वा. 20 मि. घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौरभ चंद्रकांत कुलकर्णी (वय 35 रा. शिवतेज नगर चिंचवड – प्राधिकरण, मुळ- अहमदनगर) हे त्यांचा मित्र अनिरूध्द जगदीश खरे यांना वाल्हेकरवाडी येथे सोडून घरी जात असताना मोपेडवर आलेल्या तोंडाला रूमाल व कानटोपी घातलेल्या तीन आरोपींनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले नंतर दुसर्‍या बाईकवर आलेल्या तिघांनी लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून, शिवीगाळ व धमकी देऊन 22 हजार रूपयांचा मोबाईल, रोख रक्कम, डेबीट, क्रेडीट व पॅनकार्ड अशी कागदी घेऊन पळाले.  फि र्यादीने सहा अज्ञात आरोपींविरोधात निगडी पोलिस ठाण्यात रविवार (दि. 17) रोजी दु. सव्वाबारा वा. दरोड्याची तक्रार दिली आहे. आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. पुढील तपास निगडी पोलिस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.