Alandi Dahihandi : आळंदीतील दहीहंडी फायनल सम्राट विज्या ग्रुपने फोडली

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील (Alandi Dahihandi) दोन वर्ष उत्सवांना नियम अटीचे निर्बंध होते. त्यामुळे काही सार्वजनिक उत्सव सण साजरे करताना त्यांना काही मर्यादेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यंदा मात्र दहीहंडी उत्सवाला कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने हा उत्सव अगदी उत्साहात सर्वत्र साजरा होत आहे.
आळंदीमध्ये आज लहान गोविंदा पथकाने माऊली पार्कमध्ये तीन थरांचा मनोरा उभा करून सायंकाळी साडे चारच्या सुमारास तेथील दहीहंडी फोडली. तसेच, आळंदी शहरात विविध भागातील दहीहंडी तेथील स्थानिक लहान गोविंदा पथकाने फोडल्या. तर, चावडी चौक येथे राजे शिव छत्रपती मित्र मंडळ आयोजित आळंदी गावठाण मानाची दहिहंडीचे अयोयन केले होते. येथील दहीहंडी रात्री नऊच्या सुमारास फायनल सम्राट विज्या ग्रुपने चार थरांचे मानवी मनोरे उभे करून फोडली. यावेळी येथे धर्मराज ग्रुप, डी एक्स ग्रुप यांनी ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केले होते.
दहीहंडीवेळी लहान मोठे गोविंदा दहीहंडी गाण्यांवर (Alandi Dahihandi) आनंदाने नृत्य करत होते. या दहीहंडी अयोजनावेळी पोलीस प्रशासनाने विशेष सहकार्य केले. म्हणून त्यांचे मंडळाच्या वतीने आभार मान्यात आले. भगवान श्रीकृष्णाच्या बाललिलांचे स्मरण करून आणि आनंदी जीवनाच्या उद्देशाला महत्त्व देऊन दहीहंडी सण साजरा केला जातो.
https://www.youtube.com/shorts/ESt72Xex-Zs