AAP Protest : मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने टाकलेल्या धाडीच्या निषेधार्थ आपचे आंदोलन

एमपीसी न्यूज : आम आदमी पार्टीचे नेते, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या धाडीच्या विरोधात आम आदमी पार्टी पिंपरी- चिंचवडच्या वतीने नाशिक फाटा, कासारवाडी येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.(AAP Protest) मोफत दर्जेदार शिक्षणाचे क्रांतिकारी दिल्ली मॉडेल उभारणाऱ्या शिक्षण मंत्र्यावर धाड घालणाऱ्या केंद्र सरकारचा तीव्र निषेध असो जोरदार घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.

शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवत केजरीवाल सरकारने देशासमोर एक आदर्श सरकारचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. परंतु, संकुचित राजकारण करणाऱ्या मोदी सरकारला ते पचनी पडणे कठीणच आहे.(AAP Protest)म्हणूनच आधी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकण्यात आले आणि आता मनीष सिसोदिया यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे. पण अशा प्रयत्नांमुळे आम आदमी पक्षाची आरोग्य – शिक्षण क्रांतीची ज्योत विझण्याऐवजी संपूर्ण भारतभरामध्ये तीव्र वेगाने पसरत आहे. सर्वसामान्य नागरिक याची दखल घेत आहेत आणि मोदी सरकारचा दांभिकपणा दिवसेंदिवस लोकांसमोर उघड होत आहे असा आरोप आपने केला आहे.

Kusgaon Toll Naka : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाजवळ कुसगाव टोल नाक्यावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी

या आंदोलनामध्ये आपचे गोविंद माळी, चेतन बेंद्रे, यशवंत कांबळे, स्मिता पवार, कुणाल वक्ते, अजय सिंह, वैजनाथ  शिरसाठ, ब्रह्मानंद जाधव, यल्लपा वालदोर, प्रकाश हगवने, इम्रान खान, सुरेश भिसे, अखिल शेख,चांद मुलांनी,शशिकांत कांबळे,संतोष बागाव, नाजनींन मेनन, ज्योती शिंदे, मिलन पांडे, निलेश राऊत,नंदू नारंग,शांताराम बोऱ्हाडे, सुरेंद्र कांबळे, पुनम जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.