Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे पुणे टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज : ‘रामानुजन’ यांच्या जयंती निमित्त (Alandi) पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे जिल्हा गणित अध्यापक संघ व खेड तालुका गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर 2023 रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राष्ट्रीय गणित दिन’ यानिमित्ताने घेण्यात आलेल्या ‘पुणे टॅलेंट सर्च परीक्षा’ 2023 मध्ये आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

या यशस्वी विद्यार्थ्यांचा दोंदे शिक्षण प्रसारक मंडळाचे भैरवनाथ विद्यालय दोंदे, खेड येथे गुणगौरव समारंभ संपन्न झाला. यामध्ये विद्यालयातील तेजस राजेंद्र काळे यांनी प्रथम, पुनम विठ्ठल जोरी हिने द्वितीय तर संदेश राहुल बेनाडे यांने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांना समन्वयक अमीर शेख तसेच अनुज्यायिनी राजहंस, शशिकला वाघमारे, सायुज्यता (Alandi) तायडे, लीना नेमाडे यांनी मार्गदर्शन केले. या सर्व यशस्वी व गुणी विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.