Alandi : श्री ज्ञानेश्वर विद्यालयाचे सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन परीक्षेत घवघवीत यश

एमपीसी न्यूज – सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन (SOF) ची स्थापना ( Alandi)  विज्ञान, गणित, संगणक शिक्षण, इंग्रजी, सामाजिक अभ्यास, सामान्य ज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अग्रगण्य शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ आणि मीडिया व्यक्तिमत्त्वांनी केली होती. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन जगभरातील शालेय विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या शिक्षण प्रक्रियेत नाविन्यपूर्ण उपक्रम आणि आयटीचा वापर करून वैज्ञानिक वृत्ती आणि स्वभाव वाढवण्यासाठी 25 वर्षांपासून प्रयत्न करत आहे.

Pune : नो पार्किंग व्यवस्थेतील बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी

याच अनुषंगाने 5 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या सायन्स ऑलिम्पियाड या स्पर्धेत श्री ज्ञानेश्वर विद्यालयातील इयत्ता सहावी व सातवीचे एकूण 37 विद्यार्थी बसलेले होते. त्यातील इयत्ता सहावी मधून सिद्धी सतीश थोरबोले, श्रेया वैजनाथ कदम, आदिती सुनील घुंडरे व इयत्ता सातवी मधून अनिशा अरविंद शिंदे, खुशी योगेश पाटील, तन्मय दीपक तौर हे विद्यार्थी गोल्ड मेडल व प्रमाणपत्रासाठी पात्र झाले.

सायन्स ऑलम्पियाड या स्पर्धेच्या द्वितीय स्तरातील परीक्षेसाठी सहावी मधून सिद्धी सतीश थोरबोले व सातवी मधून अनिशा अरविंद शिंदे या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. या विद्यार्थ्यांना संदीप वालकोळी, पूजा चौधरी व आरती वडगणे यांनी मार्गदर्शन केले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्रशालेचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ( Alandi)  दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.