Alandi : जुन्या बंधाऱ्यावरील जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती

एमपीसी न्यूज : आळंदी (Alandi) येथील सिद्धबेटा लगत असणाऱ्या जुन्या बंधाऱ्यावरील लोखंडी मुख्य जलवाहिनीला ठीक ठिकाणी गळती लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोज या जलवाहिनीतून शेकडो लीटर पाणी येथून वाया जात असल्याचे चित्र पहायला भेटत आहे.

तसेच, या बंधाऱ्यालगतचा इंद्रायणी नगरकडे (Alandi) जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग मागे इंद्रायणी नदीच्या पुरामुळे वाहून गेला. त्यामुळे येथील रस्ता रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. व पुरामुळे वाहून गेलेल्या रस्त्या खालील जल वाहिनीतून सुद्धा पाणी गळती चालू आहे. तेथील रस्त्याचा खालील भाग पाणी गळतीमुळे अंशतः हळूहळू ढासळत आहे. तत्पर त्या ठीकठिकाणी बंधाऱ्यावरील लोखंडी जलवाहिनी दुरुस्त करून गळती बंद करावी. तसेच, तेथील रस्त्याखालील जलवाहिनीतून होणारी गळती बंद करून रस्ता दुरुस्ती व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.