Akurdi : दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणारे अटकेत

एमपीसी न्यूज – लघुशंकेसाठी (Akurdi) थांबलेल्या दुचाकीस्वाराला लुटणाऱ्या आरोपीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे आठ वाजता आकुर्डीतील मोरया पेट्रोल पंपाजवळ घडली.
मनीष पंजाबराव कुर्हेकर (वय 31 रा. आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सौरभ महेंद्र भोसले (वय 21) व प्रतीक नरेंद्र लिंबारे (वय 22) यांना अटक केली असून वेदांत बिराजदार हा अद्याप फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मोरया पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत लघुशंकेसाठी थांबले होते. यावेळी आरोपींनी फिर्यादी यांच्याजवळ जात गाडीची चावी काढून घेऊन त्यांना मारहाण केली. तसेच, त्यांच्या मोबाईलवरून जबदस्ती पेटीएम कोड स्कॅन करून 3 हजार 132 रुपये काढून घेतले. तसेच मारहाण करत खिशातील हजार रुपयेही काढून घेतले. तसेच तुला बघून घेतो अशी धमकी देऊन ते पसार झाले. निगडी पोलिसांनी दोघांना अटक करून पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.