Pimple Nilakh : रागाने बघितले म्हणून तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज – पायी जात असताना (Pimple Nilakh) तीन ते चार जणांच्या टोळक्यांनी रागाने का बघतो म्हणून तरुणावर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केले आहे. हा प्रकार सोमवारी (दि.10) रात्री पावणे दहा वाजता पिंपळे निलख येथे घडली आहे.

चैतन्य राजू आहिरे (वय 19 रा. पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संकेत थोरात उर्फ बाळ्या, तेजस शिंदे, करण शेळके उर्फ बाब्या, बंड्या (पुर्ण नाव माहित नाही) यातील संकेत व बंड्या यांना केले आहे.

Akurdi : दुचाकीस्वाराला मारहाण करून लुटणारे अटकेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे जेवून घरी जात असताना (Pimple Nilakh) आरोपींनी त्यांना अडवून तू तेजस शिंदे याच्याकडे रागाने का बघतोस अशी विचारणा करत कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. तसेच, हाताने मारहाण करत फिर्यादीचे दात पाडले. यात फिर्यादी यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे. यावरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.