Alandi-Vadgaon : पाऊस आला म्हणून रस्त्यात थांबलेल्या महिलेचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – रात्रीच्या वेळी पाऊस आल्याने (Alandi-Vadgaon) दुचाकी थांबवून रेनकोट घालत असताना महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. 16) रात्री आळंदी-वडगाव रोडवर घडली.

दिलीप बाबुराव हांगे (वय 19, रा. वडगाव रोड, आळंदी), अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (वय 19, रा. चाळीस फुटी रोड, आळंदी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या आणखी दोन साथीदारांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (Alandi-Vadgaon) दुचाकीवरून आळंदी-वडगाव रोडने जात असताना पाऊस आल्याने त्या ज्ञानसागर मंगल कार्यालयाजवळ थांबल्या. गाडीच्या डिकीतून रेनकोट काढत असताना तिथे आलेल्या आरोपींनी फिर्यादी सोबत गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. फिर्यादींनी त्यांचा भाचा राजेश शिंदे याला बोलावून घेतले. राजेश याने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी राजेशवर कोयत्याने वार करून दुखापत केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

Gahunje : गहुंजे येथून कारमधून दोन लाखांची रोकड चोरीला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.