Maval News : अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण उत्साहात, पाच जण ठरले मानकरी

एमपीसी न्यूज – विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पाच जणांचा गौरव करत अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले. शारदाआश्रम प्राथमिक आश्रमशाळा, शिरगाव मावळ येथे नुकताच हा पुरस्कार सोहळा पार पडला. प्राध्यापक लक्ष्मण शेलार यांच्या वाढदिवस सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींना अमरसवित्री कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

कार्यक्रमासाठी अखिल भारतीय युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्ष शंकर पोकळे, उपाध्यक्ष गणेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष करणसिंह मोहिते, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मावळ तालुका अध्यक्ष चेतन वाघमारे, युवा उद्योजक रामभाऊ गोपाळे, योगेश महाराज चोपडे, शारदाआश्रम शाळेतील सर्व शिक्षक वृंद व विध्यार्थी उपस्थित होते.

 

मागील पाच वर्षात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 20 व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला आहे. त्यात 5 महिला, 5 पुरुष, 5 सामाजिक संस्था व 5 कलाकारांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूरद्वारे, मानपत्रवाचन देविदास आडकर यांनी व चेतन वाघमारे यांनी आभार मानले.

2022 अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार प्राप्त व्यक्तींची नावे –

  • रणजीत दादा जगताप, पुणे (प्रदेशाअध्यक्ष : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य )
  • गिरीष परदेशी, पुणे (मराठी सिनेअभिनेते : मराठी चित्रपट फॉरेनची पाटलीण )
  • दिनेश ठोंबरे, मावळ (अध्यक्ष: शिववंदना संघटना महाराष्ट्र )
  • बळीराम शिंदे, मावळ (सायकलपटू : पुणे ते कन्याकुमारी )
  • अक्षय खिरिड, मावळ (मॉडेल + कास्टिंग डायरेक्टर )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.