Wealth For Women : आमिशा वोरा यांचा खास महिलांसाठी आर्थिक गुंतवणूक, नियोजन आणि बचत यावर गुरुवारी सेमिनार 

एमपीसी न्यूज – ‘प्रभुदास लिलाधर’ या प्रसिद्ध ब्रोकरच्या सहव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भागधारक आमिशा वोरा यांचा आर्थिक गुंतवणूक, नियोजन आणि बचत यावर खास महिलांसाठी ‘वेल्थ फॉर वुमन’ हा सेमिनार  आयोजित करण्यात आला आहे. गुरुवारी (दि.28) दुपारी तीन ते चार यावेळेत ऑनलाईन पध्दतीने हा सेमिनार पार पडणार आहे. या सेमिनारसाठी पूर्व नोंदणी आवश्यक आहे. 

घराचे आर्थिक नियोजनाचे महत्वपूर्ण काम महिलांच्या हाती असते, त्यांना आर्थिक साक्षर करणे गरजेचे आहे. त्याच प्रेरणेतून हा सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. या सेमिनार मधून शॉर्ट आणि लॉंग टर्म गुंतवणूक, महागाई – बचत आणि खर्चाचे नियोजन तसेच संपत्ती निर्माण करणे व चक्रीय व्याज पद्धतीची ताकद यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे महिलांना आर्थिक साक्षरतेच्या पहिले पाऊल टाकण्यासाठी हा सेमिनार अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे.

‘प्रभुदास लिलाधर’ या प्रसिद्ध ब्रोकरच्या सहव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य भागधारक आमिशा वोरा या यशस्वी व्यावसायिक आहेत. त्या स्वतः चार्टर्ड अकाऊंटन्ट आहेत. विविध गुंतवणूक विषयक वार्तांकन करणा-या टिव्ही चॅनेलवरती त्या आपली मतं मांडत असतात. वोरा यांना आजवर विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या प्रदिर्घ अनुभव आणि सुक्ष्म विश्लेषणाचा नक्कीच फायदा या सेमिनारमधून महिलांना होईल.

सेमिनारसाठी नोंदणी बंधनकारक असून, त्यासाठी खाली दिलेल्या गुगल लिंकवर जाऊन आपली नाव नोंदणी करता येईल.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeZFP3Kw2H56Af4U02bm08K4AE81mSB3R9sWFhav8pql8uT0Q/viewform

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.