Amit Shah : दादा! खूप कालावधीनंतर तुम्ही पहिल्यांदा योग्य ठिकाणी बसला आहात; अमित शहा यांच्या वाक्याने सभागृहात हशा पिकला

एमपीसी न्यूज – अजित दादा! खूप कालावधीनंतर तुम्ही (Amit Shah) पहिल्यांदा योग्य ठकाणी बसला आहात. हीच जागा योग्य होती, असे केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले. त्यानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला.

सहकार मंत्रालयाच्या केंद्रीय नोंदणी कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचा अमित शहा यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी शहा बोलत होते.

अमित शहा यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत बोलून सभागृहातील वातावरण हलके केले.

Amit Shah : सहकारामुळे देशातील सर्वसामान्य माणूस राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचे स्वप्न बघत आहे

शहा म्हणाले, “अजित दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आले आहेत. त्यांच्या सोबत मी प्रथमच कार्यक्रम करीत आहे. तर मी दादांना एक गोष्ट सांगू इच्छितो. दादा, तुम्ही खूप कालावधी नंतर योग्य ठिकाणी बसला आहात. हीच जागा योग्य होती. पण आपण खूप उशीर लावलात.”

Amit Shah : सहकारामुळे देशातील सर्वसामान्य माणूस राहणीमानाचा दर्जा सुधारण्याचे स्वप्न बघत आहे

अमित शहा यांच्या वक्तव्यावर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट आणि हशा पिकला. शहा यांनी महाराष्ट्र हे देशाच्या सहकाराची राजधानी असल्याचा उल्लेख केला.

राज्यात ज्यांनी सहकाराला सुरुवात केली, त्यांचाही उल्लेख करत (Amit Shah) शहा यांनी सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणावर भाष्य केले. मात्र, शहा यांच्या अजित पवार यांच्या बाबतीतील वक्तव्याची भाषणानंतर देखील चर्चा झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.