Shirur : अमोल कोल्हे यांना शिरूर, जुन्नरमधून सर्वाधिक मताधिक्य; कोल्हे यांचा 58, 483 मताधिक्याने विजय

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस महाघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे  58 हजार 483 मताधिक्याने विजयी झाले. कोल्हे यांना शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. तर शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना -भोसरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघातून आघाडी राहिली. तर वंचित बहुजन आघाडीचे राहुल ओव्हाळ यांनी 38070 मते घेतली. तर, नोटाला 6051 मते पडली.
डॉ. अमोल कोल्हे यांनी जायंट किलर ठरत तीन वेळा खासदार म्हणून निवडून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दारुण पराभव केला. तब्बल 58 हजार 483 एवढे मताधिक्य घेत कोल्हे यांनी बाजी मारली. कोल्हे यांच्या रूपाने शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडे खासदारकी आली आहे. तसेच मराठी सिने-नाट्य सृष्टीतील पहिला खासदार होण्याचा मान कोल्हे यांना मिळाला. शिरूरमध्ये 12 लाख 92 हजार 381 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यापैकी डॉ. अमोल कोल्हे यांना 6 लाख 35 हजार 830 मते मिळाली. तर आढळराव पाटील यांना 5 लाख 77 हजार 347 मते मिळाली.
विधानसभानिहाय आकडेवारी –
जुन्नर
डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 13 हजार 182
शिवाजीराव आढळराव पाटील – 71 हजार 631
कोल्हे आघाडी – 41 हजार 551
आंबेगाव
डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 7 हजार 781
शिवाजीराव आढळराव पाटील – 82 हजार 84
कोल्हे आघाडी – 25 हजार 697

खेड-आळंदी
डॉ. अमोल कोल्हे – 99 हजार 583
शिवाजीराव आढळराव पाटील – 92 हजार 137
कोल्हे आघाडी – 7 हजार 446
शिरूर
डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 20 हजार 37
शिवाजीराव आढळराव पाटील – 93 हजार 732
कोल्हे आघाडी – 26 हजार 305
भोसरी
डॉ. अमोल कोल्हे – 88 हजार 259
शिवाजीराव आढळराव पाटील – 1 लाख 25 हजार 336
आढळराव आघाडी – 37 हजार 77
हडपसर
डॉ. अमोल कोल्हे – 1 लाख 5 हजार 712
शिवाजीराव आढळराव पाटील – 1 लाख 11 हजार 82
आढळराव आघाडी – 5 हजार 370

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.