Pune News : पीएमपीच्या ताफ्यातील आणखी 200 ई बसेस होणार सामील

एमपीसी न्यूज – शहरातील वायु प्रदुषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेसाठी केंद्र सरकारकडून दिल्या जाणार्‍या निधीतून 200 ई बसेस खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याबाबची निविदा प्रक्रीया लवकरच राबविली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे 140 बसेसचे नुकतेच लोकार्पण झाले आहे.

त्या टप्प्यातील आणखी 50 बसेस पीएमपीच्या ताफ्यात या महिनाखेरीस दाखल होतील. पुणे महापालिकेप्रमाणेच पिंपरी चिंचवड महापालिका शंभर ई बसेस घेणार आहे. यामुळे पीएमपीच्या ताफ्यात सुमारे तीनशे बसेस दाखल होतील. सध्या पीएमपीकडे डिझेलवर धावणार्‍या केवळ साडेतीनशे बसेस असून, या बसेसही टप्प्या टप्प्याने सेवेतून बाद केल्या जाणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.