Vadgaon Maval : वडगाव मावळ पंचायत समिती कडून दिव्यांग योजनेस मंजुरी

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ पंचायत समितीच्या सन 2020-2021 च्या सुधारित अर्थसंकल्पात दिव्यांग योजना राबविण्यास मंजुरी देण्यात असून पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय अथवा आपल्या मतदार संघातील पंचायत समिती सदस्याकडे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती निकिता घोटकुले व उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांनी केले आहे. 

पंचायत समितीच्या 2020 – 2021 च्या सुधारित अर्थसंकल्पात दिव्यांग बांधवासाठी दिव्यांग योजना राबविण्यास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली आहे. ज्या दिव्यांगांचे दिव्यांग प्रमाणपत्र 50% च्या वरील आहे, अशा दिव्यांग व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांचे नाव जिल्हा परिषदेच्या मंजूर यादीत असेल अशा लाभार्थ्यांनी अर्ज करू नये, अशी माहिती घोटकुले व शेवाळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.