Pune : ‘मॅजिक बॉक्स’ निर्मितीद्वारे आर्किटेक्चर विद्यार्थ्यांची डॉक्टरांना सुरक्षा भेट

Architecture students present safety gift for doctors through the creation of Magic Box.

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ  आर्किटेक्चरच्या श्रेयांस चोरडिया आणि प्रावेश मेहता दोन विद्यार्थ्यांनी मॅजिक बॉक्स या सुविधेची निर्मिती करून कोरोना रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना सुरक्षेची भेट दिली आहे.

कोरोना रुग्णांची तपासणी,उपचार करताना या बॉक्स द्वारे सुरक्षित अंतर ठेवणे शक्य होते. रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील थेट संपर्क या बॉक्स च्या वापराने येत नाही.

हे मॅजिक बॉक्स या विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 1 याप्रमाणे रुबी हॉल, मंगेशकर हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय(औंध), नायडू हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल येथे भेट दिले आहे. प्राचार्य लीना देबनाथ, प्राध्यापक ध्वनी अय्यर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.