Hinjawadi News : गांजा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; अर्धा किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गांजा बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) दुपारी मुळशी तालुक्यातील भोइरवाडी येथे करण्यात आली.

अक्षय मधुकर गायकवाड (वय 24, रा. भोईरवाडी, ता. मुळशी), उमेश साधू यादव (वय 53, रा. माणगाव, ता. मुळशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई प्रसाद जंगीलवाड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील भोईरवाडी येथे दोघेजण संशयितरित्या फिरत असून त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 517 ग्रॅम गांजा, मोपेड दुचाकी असा एकूण 52 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.