Delhi: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ‘सेल्फ क्वारंटाईन’

Arvind Kejriwal goes into self-quarantine मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होत आहे.

एमपीसी न्यूज- आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची आज (दि.8) प्रकृती बिघडली आहे. त्यांनी स्वत:ला राहत्या घरात क्वारंटाइन करुन घेतले आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व बैठका रद्द केल्या आहेत.

मुख्यमंत्री केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होत आहे. यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका रविवार दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत.

केजरीवाल यांनी खबरदारी घेत स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.