Pimpri: ‘भाजी मंडईमधील फळ व भाजी विक्रेत्यांना पट्टे मारून जागा निश्चित करुन द्या’

Pimpri: 'Fruit and vegetable sellers in the vegetable market should be leased and space should be fixed' सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, फेरीवाला धोरणाची अमलबजावणी केल्याशिवाय त्यांना विस्थापित करू नये असे आदेश आहेत.

एमपीसी न्यूज- पिंपरी येथील भाजी मंडई मधील फळ व भाजी विक्रेत्यांना पट्टे मारून जागा निश्चित करुन द्यावी अशी मागणी टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने करण्यात आली आहे.

टपरी पथारी हातगाडी पंचायतच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, हॉकर्स धोरण 2007 फेरीवाला कायदा 2009 प्रमाणे पिंपरी भाजी मंडईमध्ये व्यवसाय करणाऱ्या सर्व फेरीवाल्यांचा सर्वे झाला असून त्यांना परवाना देखील देण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे, फेरीवाला धोरणाची अमलबजावणी केल्याशिवाय त्यांना विस्थापित करू नये असे आदेश आहेत.

परंतु, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व्यापारी घरी असताना त्याचा फायदा घेत सर्व दुकाने हातगाड्या आणि साहित्याची मोडताड करून मालाची नासधूस केली व सर्व व्यापाऱ्यांना विस्थापित करण्यात आले.

पुढे म्हटले आहे की, फेरीवाला धोरणाप्रमाणे सर्वेक्षण झालेल्या सर्वांचे पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करणे आवश्यक आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या सर्व फळ, भाजी आणि इतर साहित्य विक्रेत्याचे तातडीने पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करावे, तोपर्यंत त्यांना पूर्वीच्या ठिकाणी पट्टे मारून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

याबाबत महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना टपरी पथारी हातगाडी पंचायत पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष रमेश शिंदे यांनी निवेदन दिले आहे.

या निवेदनावर पंचायतीचे प्रदेश सचिव प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, अस्लम मणियार, नजर मुलानी, महेश गुळगोंडा रफिक आत्तर, शिव अग्रवाल, पुरुषोत्तम जम, फिरोज तांबोळी, असलम शेख, आशाबाई देवकर यास्मिन गौस, सोमनाथ शिंदे, सुधाकर तुरुकमारे आदींच्या सह्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.