22.8 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 9, 2022

Maharashtra Political Crisis : स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा – उध्दव ठाकरे

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेना कार्यकर्त्यांकडून बंडखोर आमदार यांच्या कार्यालयावर हल्ला केला जात आहे. (Maharashtra Political Crisis) याच दरम्यान, शनिवारी शिवसेनेच्या कार्यकारीणीची बैठक सेना भवनात झाली. त्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी  स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना ठणकाविले.

 

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला.स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा, सेनेच्या बापाच्या नावाने मागू नका, आधी नाथ होते आता दास झाले, असे म्हणत उध्दव ठाकरे यांनी बंडखोरांचा बापच काढला.

Ramdas Athavale : आरपीआयचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी – रामदास आठवले

 

या बैठकी दरम्यान हिंदुहदयसम्राट यांचीच शिवसेना आहे व त्यांचीच राहील, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोणी कोणत्याही पदावर असो, त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याचे अधिकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Maharashtra Political Crisis) यांना या बैठकीत देण्यात आले. याबाबतचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

 

 

 

बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही. कोणताही बेईमान स्वार्थासाठी हे करता येणार नाही. जर तुम्हाला मतं मागायची आहेत, तर तुमच्या बापाच्या नावानं मागा. सेनेच्या बापाच्या मागे लागू नका, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत एकूण सहा (Maharashtra Political Crisis)  ठराव मंजूर करण्यात आले.

 

बैठकीत शिवसेनेशी गद्दारी करणार्यांवर कठोर कारवाईचे सर्वाधिकार पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांना देण्यात आले.याबाबतचा ठराव संजय राऊत यांनी मांडला.

 

एकनाथ शिंदे गटाने आपल्या गटाचे नाव ‘शिवसेना – बाळासाहेब ठाकरे’ असे ठरविले आहे.  शिंदे वारंवार खरी शिवसेना आपलीच आहे असे सांगत आहेत. आज संध्याकाळी ‘शिवसेना बाळासाहेव ठाकरे’ असं या नव्या गटाचे नाव असणार आहे. यानंतर बाळासाहेब ठाकरे व शिवसेना हे नाव इतर कोणालाही वापरता येणार नाही,असा ठराव देखील शनिवारी मंजूर करण्यात आला.

spot_img
Latest news
Related news