Pune News : शिवाजीनगर येथे उसने पैसे परत मागितल्याने मित्राच्या पत्नीचा विनयभंग

एमपीसी न्यूज : उसने दिलेले पाच लाख रुपये परत मागितल्याने एकाने मित्राच्या पत्नीचा विनयभंग केला. शिवाजीनगर येथील घारपुरे कॉलनीमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. एका 34 वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी लॅबर्ट मार्टिन फर्नांडिस याच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी, आरोपी हा फिर्यादी यांच्या पतीचा मित्र आहे. फिर्यादीने पतीच्या सांगण्यावरून दोन वर्षांपूर्वी आरोपीला पाच लाख रुपये उसने दिले होते. मागील काही दिवसांपासून हे पैसे त्या परत मागत होत्या. परंतु आरोपी पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता. त्यामुळे फिर्यादी या रविवारी आरोपी राहत असलेल्या इमारतीमध्ये येऊन त्याच्याकडे पैसे मागितले.

परंतु आरोपीने “आता माझ्याकडे पैसे नाहीत, तुम्ही बिल्डिंग मध्ये काही बोलू नका, माझी दुसरी कडे रूम आहे आपण तिथे जाऊन बोलू” असे म्हणून फिर्यादीचा हा ओढला आणि फिर्यादी सोबत अश्लील चाळे देखील केले. शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.