Pimpri Crime News : धक्कादायक! सात जणांकडून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील एका महिलेला सात जणांना मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सात जणांविरूद्धा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

निखिल बानाटे – वय 29 वर्षे, विठ्ठल बानाटे – वय 60 वर्षे, योगेश बानाटे – वय 27 वर्षे, सुकुमार कांबळे – वय 42 वर्षे आणि तीन महिला असे एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी पीडित महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

International Yoga Day 2022 : शहरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात साजरा

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 11 मे 2018 ते 20 जून 2022 दरम्यान आरोपींनी वडिलांकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावून सतत शारीरिक व मानसिक त्रास देऊन मारहाण केली तसेच फिर्यादीस कपडे वाळत घालण्याच्या दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 3659 नव्या रुग्णांची नोंद तर 3356 रुग्ण कोरोनामुक्त

आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भा. द. वि. कलम 307, 498(अ), 323, 504, 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिस आणखी तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.