PCMC News : सार्वजनिक शौचालयांच्या सफाईसाठी 2 वर्षांसाठी सव्वा कोटीचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयहद्दीतील चिखली, निगडी, यमुनानगर, तळवडे परिसरातील सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे. दोन ठेकेदारांमार्फत दोन वर्षांसाठी करण्यात येणाऱ्या या साफसफाईसाठी एक कोटी 20 लाख 93 हजार रुपये खर्च होणार आहे.

महापालिका (PCMC) ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयहद्दीतील चिखली (प्रभाग क्रमांक 1), पूर्णानगर (प्रभाग क्र. 11), तळवडे- रूपीनगर (प्रभाग क्र. 12) आणि निगडी- यमुनानगर (प्रभाग क्र. 13) परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची खासगीकरणाद्वारे यांत्रिकी पद्धतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येते. प्रभाग क्रमांक 1 व 11 मधील साफसफाईसाठी एक, तसेच प्रभाग क्र. 12 व 13 मधील साफसफाईसाठी दोन अशा तीन स्वतंत्र निविदा मागविण्यात आल्या. प्रभाग क्र. 1 आणि 11 मधील साफसफाईच्या कामासाठी दोन वर्षे कालावधीकरिता 72 लाख 13 हजार रुपये खर्च अपेक्षित धरून निविदा मागविण्यात आल्या.

Pimpri Crime News : धक्कादायक! सात जणांकडून महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न

तर, प्रभाग क्र. 12 मधील साफसफाईसाठी 24 लाख 22 हजार रुपये खर्च अपेक्षित धरून निविदा मागविल्या. या दोन्ही निविदाप्रक्रियेत ‘सॅम एंटरप्रायजेस’ या ठेकेदाराने निविदादराच्या 29.13 टक्के कमी म्हणजेच 51 लाख 12 हजार व 17 लाख 16 हजार रुपये असे दर सादर केले. त्यामुळे त्यांना हे काम देण्यात येणार आहे. प्रभाग क्र. 13 निगडी गावठाण यमुनानगर परिसरातील सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यासाठी 72 लाख 13 हजार रुपये खर्च अपेक्षित धरला.

Eknath Shinde : मिलिंद नार्वेकर गुजरातला पोहोचताच थेट मातोश्रीवर रश्मी ठाकरेंना फोनाफोनी! एकनाथ शिंदे फोनवरून काय म्हणाले?

त्यानुसार ‘तावरे कन्स्ट्रक्शन कंपनी’ या ठेकेदाराने निविदादराच्या 27.2 टक्के कमी म्हणजेच 52 लाख 64 हजार रुपये दर सादर केला. या दोन ठेकेदारांना दोन वर्षांसाठी हे काम देण्यास अतिरिक्त आयुक्त यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील चार प्रभागांमधील सार्वजनिक शौचालये आणि स्वच्छतागृहांच्या दैनंदिन साफसफाईसाठी दोन वर्षांत एक कोटी 20 लाख 93 हजार रुपये खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.