Alandi News : मकर संक्रांतीनिमित्त संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

एमपीसी न्यूज – मकर संक्रांतिनिमित्त देवाची आळंदी सजली आहे. आळंदीला संक्रांतीची मोठी परंपरा लाभली आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वरांच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मंदिरातील ज्ञानेश्वर माऊलींच्या आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींना हलव्याचे हार घालण्यात आले आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गाभारा, सभा मंडपात रंगीबेरंगी फुलांनी सजावट केलीय, यामध्ये देशी, विदेशी फुलांची मनमोहक आरास करण्यात आली आहे.

माऊलींच्या मंदिरात संक्रांतीच्या दिवशी वारकरी, भाविक दर्शनाला येत असतात. मात्र यंदा कोरोनामुळे मंदिर प्रशासनाने दोन दिवसांसाठी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.