BCCI : क्रिकेटपटू, पंचांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ; जय शाह यांची व्टिटव्दारे माहिती

एमपीसी न्यूज – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय क्रिकेटपटू (पुरुष व महिला) आणि सामना पंचांच्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी व्टिटरच्या माध्यमातून भारताचे माजी महिला आणि पुरुष क्रिकेटपटू आणि पंचांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याची माहिती दिली. बीसीसीआयच्या (BCCI) या निर्णयामुळे ९०० क्रिकेटपटूंचा फायदा होणार आहे.

PM Narendra Modi Dehu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देहूमध्ये आगमन (LIVE)

जय शाह यांनी केलेल्या व्टिटमध्ये म्हंटले आहे की, माजी क्रिकेटपटू (पुरुष व महिला) आणि सामना पंच यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याची घोषणा करताना मला आनंद होतोय. तब्बल ९०० क्रिकेटपटू आणि पंचांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. त्यामुळे जवळपास ७५ टक्के खेळाडू आणि अधिकार्यांच्या पेन्शनमध्ये १०० टक्के वाढ होईल.

 

https://youtu.be/toMk5v4NvvQ

 

 

पेन्शनसाठी चार स्लॅबची निर्मिती

बीसीसीआयने (BCCI) पेन्शनसाठी चार स्लॅब बनवले आहेत. यापुर्वी ज्यांना १५ हजार रुपये पेन्शन मिळायची त्यांच्या पेन्शनमध्ये १५ हजार वाढ करण्यात आली आहे. त्यांना आता ३० हजार मिळणार आहेत.त्याशिवाय ज्यांना २२ हजार ५०० रुपये मिळायचे त्यांना आता ४५ हजार रुपये मिळणार आहेत.३० हजार पेन्शन मिळत असलेल्या खेळाडूंना ५२ हजार ५०० मिळतील. तसेच ३७ हजार ५०० रुपये मिळणार्यांना ६० हजार रुपये मिळणार आहेत. ५० हजार पेन्शन असलेल्या खेळाडूंना आणि पंचांना ७० हजार रुपये मिळणार आहेत.येत्या एक जूनपासून नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.