Bhosari crime News : रिक्षा प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज – पतीसोबत रिक्षाने प्रवास (rickshaw journey) करत असलेल्या महिलेच्या पर्समधून दोन अनोळखी महिलांनी लक्ष विचलित करून एक लाख 49 हजार 500 रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरून (Theft) नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 18) सायंकाळी सव्वासहा ते सातच्या कालावधीत घडला असून याबाबत गुरुवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्पा हिम्मतराव पाटील (वय 57, रा. थेरगाव) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता पतीसोबत नाशिक फाटा येथून पिंपरी गाव, तापकीर चौक दरम्यान रिक्षातून प्रवास करत होत्या. रस्त्यात रिक्षामध्ये दोन अनोळखी महिला बसल्या.

_MPC_DIR_MPU_II

त्या महिलांनी पाटील यांच्या पर्समधून एक लाख 30 हजारांचे सोन्याचे गंठण, 15 हजारांच्या सोन्याच्या साखळ्या आणि साडेचार हजारांची रोकड पाटील यांचे लक्ष विचलित करून चोरून नेली.

तापकीर चौकात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत तीन दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.