Bhosari Crime News : विभक्त राहणाऱ्या पतीकडून पत्नीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – विभक्त राहणाऱ्या पतीने पत्नीला अश्लील मेसेज पाठवून विनयभंग केला. दापोडी याठिकाणी 27 मे 2021 रोजी व त्यानंतर वेळोवेळी हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन अनिल पंडित (वय 45, रा. धानोरी, पुणे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीच्या पत्नीने शुक्रवारी (दि.25) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी महिला पती- पत्नी असून ते वेगवेगळे राहतात. आरोपी पतीने पत्नीच्या मोबाईलवर वारंवार अश्लील मेसेज पाठवले. पत्नीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पुजा कदम अधिक तपास करत आहेत‌‌.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.