Bhosari News: चक्रपाणी वसाहत येथे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक ; दोन पिस्टल, सहा जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – चक्रपाणी वसाहत, भोसरी येथे गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने दोघांना शस्त्र बाळगल्या प्रकरणी अटक केली आहे. दोघांकडून दोन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. 11) रात्री सव्वासात वाजता करण्यात आली.

प्रदीप उर्फ दाद्या मोहन दाभाडे (वय 28, रा. धावडेवस्ती, भोसरी), परमेश्वर उर्फ प्रशांत मधुकर मेलगिरे (वय 25, रा. धावडेवस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई गणेश सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी अवैधरीत्या पिस्टल स्वताकडे बाळगल्या असल्याची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री चक्रपाणी वसाहत येथे कारवाई करून प्रदीप आणि परमेश्वर या दोघांना ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन पिस्टल आणि सहा जिवंत काडतुसे असा 71 हजार 200 रुपयांचा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी पिस्टल आणि काडतुसे जप्त करून दोघांना अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.